अव्यक्त
ब्लॉग लिहिण्याचा विचार बरेच दिवस माझ्या मनात घोळत होता. सुरवातीला
मी काही मनावर घेतलं नाही. पण , हा विचार काही केल्या मला स्वस्थ बसू
देत नव्हता. काहीतरी होत जे आतून मला सतत उस्फूर्त करत होत.
नेमकं काय होत ते ????? कदाचित मनातले विचार सगळ्यांसमोर मांडायची उर्मी असेल
ती.....थोडक्यात काय तर मला व्यक्त व्हायचं होत ....पण मला जे व्यक्त करायचं होत
तो काही भावनांचा निचरा नव्हता. म्हणजे मी रागावले आहे , खूष आहे किंवा दुःखी आहे म्हणून मला मन हलक करावस वाटत होत...
तर तसं काही नव्हत ....काही गोष्टी ज्या मला सुचल्या , जाणवल्या त्या सर्वांसमोर मांडायच्या होत्या. थोडक्यात सर्वांशी शेअर
करायच्या होत्या. खर तर त्या सगळ्याचा आपल्या रोजच्या व्यवहाराशी काहीच संबंध
नव्हता पण तरीही मला ते सार व्यक्त
करायचं होत .. ........का? माहित नाही.
जेव्हा मी याबद्दल विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आल की , हि काही माझ्या एकटीची गरज नाही. कदाचित
प्रत्येकालाच अस वाटत असावं.. प्रत्येक जणच व्यक्त व्हायचा प्रयत्न करत
असतो. प्रत्येकाची भाषा निराळी , माध्यम निराळ पण कारण मात्र एकंच , सर्वांसमोर व्यक्त होणे..........
रोज सूर्य एका बाजूने उगवतो आणि दुसऱ्या
बाजूने मावळतो , किंवा हि नदी समुद्राच्या ओढीने सतत
वाहतच असते ,,,त्यात असं काय वेगळ असणार आहे हो? पण एका चित्रकाराला त्यात नविन रंग दिसतो, वेगळ रूप भावत आणि ते सार तो कागदावर उतरवतो. ते त्याच व्यक्त होणंच तर आहे ना.. ..रंगांच्या मदतीने....पण कशासाठी?
अभंगातून पांडुरंग आळवणारे संत असोत व दोन जीवांच्या मिलनाचे गीत
गाणारे प्रेमकवी .....शब्दांना धरून ते स्वःत व्यक्तच तर होत असतात न?
कलाकारांच राहू दे! बहुतेक त्यांचा
जन्मच व्यक्त होण्यासाठी असतो. पण, आपल्यासारख्या सर्व-सामान्यांचं काय? विविध सभा , परिषदा , परिसंवाद , स्नेहसंमेलने ...विविध विषय ,इतकी सारी चर्चा ... हि सारी धडपड कशासाठी आणि
कुणासाठी? ..आपले विचार व्यक्त करण्यासाठीच ना?
का इतकं महत्वाचं आहे हे व्यक्त होण? म्हणजे आपल्याला एखाद्या सिनेमा बद्दल काय वाटल हे नाही सांगितलं
कुणाला तर जग थोडंच थांबणार आहे? तरीही आपण धडपडतोच की.. कुणाला तरी ते सांगण्यासाठी. कोणाला चविष्ट खाण्याचा नविन
अड्डा सापडलेला असतो ; कोणाला एखाद्या विषयाची नविन माहिती
मिळालेली असते ; तर कोणाला बरेच दिवस न सुटलेल्या
कोड्याच उत्तर सापडलेलं असत आणि ते सगळेजण कोणाशी तरी शेअर करण्यासाठी बेचैन
झालेले असतात . पण, का होत असेल असं? वर वर व्यवहाराशी
निरर्थक वाटणाऱ्या या गोष्टी व्यक्त करण्याची हि उर्मी कोणती
असेल ??
खूप विचार केला , पण मला काही सापडलं नाही याच उत्तर. मग
म्हटलं तुमच्यासमोर व्यक्त कराव सगळ ........तुम्हीही विचार करून पहा
........कदाचित तुम्हाला सापडेल याच उत्तर....
४ टिप्पण्या:
survati pasunch maanus kaLapaane rahanaara praaNi ahe. ani manatalya gosthi kuthe tari vyakt hya karavyach lagataat nahitar tya sathat jaataat ani manatale kappe chhote hot jaataat ani mag apalyala kase tari hote. mhanun kuthe na kuthe kase na kase apan vyakt honyacha prayatn karat asato. nice thoughts.
:) ajun wishay changle hatalu shaktes.... baki pictures ani template surekh use kela ahes :)
thnks harshal and sukrut......
Didn't get much from this post. May be my thinking is not on that level, but understood the moto. Good start, please keep it up!!!
टिप्पणी पोस्ट करा